Sunday, 6 September 2015

कोकणासारखी हिरवळ शोधुन सापडणार नाही

कोकण खरचं खुप सुंदर आहे पण सध्या वातावरण बदलामुळे महाराष्ट्रभर पावसाचं प्रमाण जस कमी झालं तसचं कोकणात पण त्याचा मोठा परीणाम झाला आहे पण कोकण कसाही असला तर सुंदरच दिसतो हे खरं                                               


Saturday, 5 September 2015

गावाकडे घर असणं म्हणजे खरच जाम मज्जा

कोकणात एखाद स्वतःचं घर असणं म्हणजे लय भारी ...
पावसात कोकणात फिरणं धमाल करणं मग एकदम सोप्प
असच घर असाच रस्ता असचं कोकणातलं सुंदर जग

Friday, 4 September 2015

गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु

ही गा़डी सकाळी 11.10 वाजता पनवेलहून सुटली.
ती चार वाजता चिपळूणला पोहोचेल. तर चिपळूण - पनवेल (डेमू) ही
गाडी याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल.आणि रात्री
10.30 वाजता पनवलेला पोहचेल. आजपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही गाडी
प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येतेय.
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेड, वामणे, करंजाडी, विन्हेरे,
दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या ठिकाणी ही
गाडी थांबेल.

Monday, 31 August 2015

धबधबा एकावर एक फ्री....

पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कड्याकपा-यातून अवखळ
धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे,
मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगरभागातून अजून कितीतरी अज्ञात
धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात. स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे
निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण
डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ
करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा
अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-
मैत्रिणींचा ग्रुप.
आणी आपल्यामधे हवी भटकंतीची ओढ.....
कोकण फिरायचा तर फक्त पावसातच...