
Saturday, 31 October 2015
सोलानपाडा धबधबा

Wednesday, 28 October 2015
Thursday, 8 October 2015
किल्ले सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे
![]() |
सिंधुदुर्ग किल्ला उद्धव ठाकरे यांच्या Camera मधुन |
Wednesday, 7 October 2015
गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची
मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात
विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ
आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा
घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १
किलोमीटर. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ
पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.
गणपतीपुळे रत्नागिरीपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र राज्य
परिवहन मंडळ (S.T.) मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इत्यादी शहरांपासून गणपतीपुळे
येथे जाण्यासाठी थेट बससेवा पुरवते.
गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (M.T.D.C.)चे विश्रामगृह
आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते.
गणपतीपुळे हे मुबईपासून ३७५ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक ६६ वरून जाताना निवळी फाट्यावरून उजव्या हाताला वळले की
३२ किमी अंतरावर गणपतीपुळे आहे.
तसेच जर रेवस रेड्डी सागरी महामार्गाने गेल्यास तर व्हाया रत्नागिरी शहरातूनही
पर्यायी मार्ग आहे.
गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला
जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरुन एसटीची एशियाड बस सेवा आहे. जवळच नेवरे
आणि भंडारपुळे ही सुंदर गावे आहेत. गणपतीपुळे आणि आसपासचा परिसर अतिशय
आल्हाददायक आहे. इथून जवळच २ किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत
ह्यांचे स्मारक आहे.
गणपतीपुळे हे रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. ह्या
गावाच्या इतिहासात असेही म्हटले जाते की गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे,
मालगुंड आणि भंडारपुळे ह्या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून
आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती
अशी येथील ख्याती आहे. गणपतीपुळेलगतच भंडारपुळे हे गाव आहे. जितका गणपतीपुळे
इथला आहे तितकाच भंडारपुळे गावचा समुद्रकिनाराही रमणीय आहे. ह्या सर्व
गावांत प्रामुख्याने भंडारी, कुणबी आणि कोकणस्थ ब्राह्मण समाज आहे.
इथून काही अंतर पुढे गेल्यावर ६ किमी अंतरावर नेवरे गाव आहे, नेवरे गावाजवळे सुरूचे
बन व वाळूचा किनारा आहे.
त्याच रस्त्याला लागून रत्नागिरीच्या दिशेने ’आरे वारे’ हा सनसेट पॉइन्ट आहे..
’नवरा माझा नवसाचा’ आणि ’फुल थ्री धमाल’ ह्या चित्रपटांचे शूटिग
गणपतीपुळ्याला झाले होते. रत्नागिरी हे जवळचे रेलवे स्थानक व शहर आहे.
रत्नागिरी आगारातून १०-१५ मिनिटानी गणपतीपुळे येथे जाण्यासाठी बसेस आहेत.
Monday, 5 October 2015
... कोकण आमचा लई भारी ...
धबधबे असे पावसात सर्वत्र दिसतात
रस्ता जिकडे जाईल तिकडे पाण्याचे पाट असतात
फिरण्याची मजा शब्दात सांगण कठीण
पण एकदा याव असच वाटेल नेहमी
कोकण किनारा – • उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२० कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८० कि.मी. आहे. • अरबी समुद्रालगतच्या सखल भागासम्हणतात – खलाटी • कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी • कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९ • रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु (न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा • कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.) रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड • महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनाप ैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई • राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई) • राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा • कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय • कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प –उरण (रायगड) • कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव • दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा • कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ, जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनवेल
Saturday, 3 October 2015
Kille Nivati Beach
The Nivati village location is amidst the greenery of plantations and ocean
roars form the west. The air is sweet, moist and clean and the seawater is
crystal clear, in its natural form. The Nivati fort located nearby provides
historical significance to this place. The atmosphere is serene and the
calmness of the sea and shores alike are reassuring in these hectic days of
today.Offers peace and serenity to independent travelers. Fishermen seen
launching their traditional boats and nets daily into the sea is an interesting
feature to watch on this beach. Adjoining the beach is a twin village Kochra,
which offers wonderful view of small tropical oasis on Nivati's shore.


