Saturday, 31 October 2015

सोलानपाडा धबधबा

सोलानपाड़ा धबधबाकर्जत स्टेशन पासून 26 कीलोमीटर आणि नेरळ स्टेशन वरून 24 किलो मीटर अंतरा वरील सोलानपाडा डॅम वर बनविण्यात आलेला हां धबधबा अतिशय सुरक्षित तितकाच् सुंदरआहे.लहान मुलाना देखील निर्धोक पणे पाण्यात डुंबण्याचा आनंद या ठिकाणी घेता येतो.सह कुटुंब एक दिवसाची पावसाळी सहल करायची असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे.स्वतः ची गाडी नसेल तर नेरळ स्टेशन वरून दर पंधरा मिनिटांनी कशेळे पर्यंत जाणाऱ्या आणि कशेळे येथून जांबरुग् कड़े जाणाऱ्या मिनीडोअर रिक्षाने येथे सहज पोहचता येते.त्या ठिकाणी गेल्या नंतर आणि तेथील सृष्टि सौंदर्य पाहिल्या नंतर येथून परत फिरायला मनच होत नाही.या धबधब्या ला एकदा नक्की भेट दया.

2 comments: