पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कड्याकपा-यातून अवखळ
धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे,
मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगरभागातून अजून कितीतरी अज्ञात
धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात. स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे
निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण
डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ
करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा
अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-
मैत्रिणींचा ग्रुप.
आणी आपल्यामधे हवी भटकंतीची ओढ.....
कोकण फिरायचा तर फक्त पावसातच...
Monday, 31 August 2015
धबधबा एकावर एक फ्री....
गणपतीची लगबग....अन चाकरमानी चालले कोकणात
बा देवा गणपती गजानना म्हाराजा....
तुझा आगमन अगदी काही दिवसावर येवन ठेपला हा म्हाराजा. तुझी
सगळी लेकरा तुझ्या स्वागताक आणी तुझी सेवा-चाकरी
करुक आतुरली आसत , सगळ्याचे डोळे तुझ्या आगमनाकडे लागले आसत म्हाराजा. तेव्हा तुका
सांगणा करतय म्हाराजा.
जे जे तुझे भक्त तुझ्या सेवेक गावाक येतहत तेंका कामावरसुन सुट्टी गावांदेत म्हाराजा.. तेंच्या
सायबाच्या काट्यार बस आणी तेंका सगळ्यांका तुझ्या सेवेक सुखरुप गावाक पोचव रे म्हाराजा...
कोकणातली शेतीची कामं आटपली एकदाची....
जरी सध्या महाराष्ट्रात अन्य ठिकाणी दुष्काळ असेल तरी कोकणात खास करुन रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधे कधी पाउस नाही असं होतं नाही...
पण यंदा मात्र पावसाने थोडी गंमतच केली सुरवात छान झाली मात्र मधेच असा काही गायब झाला की लोकांची फारचं मोठी पंचाईत झाली होती...
पण लोकानी प्रसंगी मोटर लाउन पाणी आणलं अन शेती जगवली अन आता तर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे...
आता गणपती मधे पण तो असाच बरसेल अस वाटतं